जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत, परंतु उर्वरित दिवशी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23, 24 आणि 27 जानेवारी असे तीन दिवस असणार आहेत. 25 आणि 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी तर मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नलावडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री ओमकार देशमुख पुढे म्हणाले की धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 12 गट असून पंचायत समितीचे 24 गण आहेत 274 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी तर धाराशिव पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असणार आहे.
एक जुलै 2025 चे मतदार यादी ग्राह्य धरून मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना सहा लाखापर्यंत तर पंचायत समिती गणातील उमेदवारांना चार लाख 50 हजार रुपयांपर्यंतची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिले आहे.
जिल्हा परिषद उमेदवारांसाठी एक हजार रुपये तर पंचायत समिती उमेदवारांसाठी 700 रुपये इतके डिपॉझिट घेतले जाणार असून आरक्षण उमेदवारांसाठी जिल्हा परिषदेला 500 रुपये आणि पंचायत समितीला साडेतीनशे रुपये असे डिपॉझिट असणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांना त्यांच्याकडे शौचालय असल्याचा पुरावा तसेच त्याचा वापर करत असलेल्याचे प्रमाणपत्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र आणि अपत्या संबंधीची माहिती याचे शपथपत्र उमेदवारी अर्ज सोबत दाखल करणे बंधनकारक आहे.
एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येणार आहेत
ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे यात आचारसंहिता कक्ष परवानगी सभा पदयात्रा कक्ष पोस्टल मतदान कक्ष यासह निवडणूक संबंधातील इतर कामांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी दिली.
तर आचारसंहिता कक्षा संदर्भात धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संतोष नलावडे यांनी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच केले. उमेदवारांना प्रचारादरम्यान कोणत्याही धार्मिक स्थळांचा किंवा धार्मिक प्रार्थना स्थळांचा आणि देवी-देवतांचा फोटो वापरण्यास मनाई असून धार्मिक सण उत्सव यांचा आधार देखील घेता येणार नाही.असे आढळून आले असतात काळ संबंधित और गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच सोशल मीडियातून होणारी जाहिरात बाजी यावरही निर्बंध असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार जनजागृती साठी मतदार पाठशाला तसेच रॅली पदयात्रा सायकल फेरी यासारख्या उपक्रमातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा