धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांची निवड झाली आहे त्यांनी महाविकास आघाडीचे अक्षय जोगदंड यांचा 13 मतांनी पराभव केला. तसेच नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पार्टी कडून सुजित साळुंखे आणि अमोल राजे निंबाळकर तर शिवसेना उबाठा कडून पंकज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पंकज भोसले यांची निवड झाली.
धाराशिव नगरपालिकेचे विशेष सर्वसाधारण सभा आज 16 जानेवारी रोजी घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 यात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली.
उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे नगरसेवक अक्षय जोगदंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता तर भारतीय जनता पार्टी कडून अक्षय ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.यावेळी झालेल्या निवडणुकीत नगरपालिकेत बहुमतात असलेल्या भारतीय जनता पार्टीला 22 नगरसेवकांचे मतदान झाले.याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांचेही मत अक्षय ढोबळे यांना झाले त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात 23 मते झाली.
तर अक्षय जोगदंड यांना काँग्रेसच्या तीन मतांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ एम आय एमच्या नगरसेवकाचे एक अशी एकोणीस मते पडणे अपेक्षित होते परंतु काँग्रेसच्या अक्षय जोगदंड यांना दहाच मते मिळाल्यामुळे त्यांचा 13 मतांनी पराभव झाला.
      यावेळी भारतीय जनता पार्टी कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सुजित साळुंखे आणि अमोल राजे निंबाळकर करण्यात आली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पंकज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पंकज भोसले यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यानंतरस्वीकृत नगरसेवकांचा सत्कार भाजपा गटनेते अमित शिंदे यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका परिसरात विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी