काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी
काक्रंबा गटात अस्मिता कांबळे यांची दावेदारी
धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून यात इच्छुक उमेदवारांची आपली दावेदारी इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे.
काक्रंबा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या अस्मिता कांबळे यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे .तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या जिल्हा परिषदेसाठीच्या राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ अस्मिताताई कांबळे यांनी आपली दावेदारी सांगितली आहे.
मागील काळात अस्मिता कांबळे या जिल्हा परिषदेला अध्यक्ष होत्या . त्यांचे वडील शिवदास कांबळे हे सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते . त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगले असे काम केले असल्यामुळे त्यांनी काक्रंबा जिल्हा परिषद गटातून आपली मागणी लावून धरली आहे.
शिवदास कांबळे यांनी मंगरूळ आणि काक्रंबा मतदार संघामधुन निवडणूक लढवली विक्रमी मताने निवडून आले . मंगरूळ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर समाज कल्याण सभापती झाले आणि काक्रंबा मतदार संघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले .
सौ.अस्मिता ताई कांबळे यांनी मागील काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सांभाळताना केलेली अनेक विकास कामे तसेच अनेक विभागात जिल्हा परिषदेने मिळवलेले पुरस्कार हा त्यांच्या जमेच्या बाजूचा विषय आहे.
त्यांच्या कार्यकाळात झालेली अनेक विकास कामे जिल्ह्याच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरणारे आहेत.
त्यामुळे एका कर्तृत्वात महिला उमेदवाराला काक्रंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी जेणेकरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि अर्चनाताई पाटील यांच्या सोबत धाराशिव जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे त्यामुळे काक्रंबा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे आणि त्यांचा दावा मजबूत केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा