जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी घेतली आढावा बैठक
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत उमरग्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न , जनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. गावागावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे , असे आवाहन करण्यात आले. “ उमेदवार कोणताही असो , त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे ,” असे सांगत प्रामाणिक कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे उमरगा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार श्री प्रवीण स्वामी , माज...