धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत, परंतु उर्वरित दिवशी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23, 24 आणि 27 जानेवारी असे तीन दिवस असणार आहेत. 25 आणि 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी तर मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नलावडे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री ओमकार देशमुख पुढे म्हणाले ...
काक्रंबा गटात अस्मिता कांबळे यांची दावेदारी धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून यात इच्छुक उमेदवारांची आपली दावेदारी इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. काक्रंबा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या अस्मिता कांबळे यांना भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे .तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या जिल्हा परिषदेसाठीच्या राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ अस्मिताताई कांबळे यांनी आपली दावेदारी सांगितली आहे. मागील काळात अस्मिता कांबळे या जिल्हा परिषदेला अध्यक्ष होत्या . त्यांचे वडील शिवदास कांबळे हे सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते . त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगले असे काम केले असल्यामुळे त्यांनी काक्रंबा जिल्हा परिषद गटातून आपली मागणी लावून धरली आहे. शिवदास कांबळे यांनी मंगरूळ आणि काक्रंबा मतदार संघामधुन निवडणूक लढवली विक्रमी मताने निवडून आले . मंगरूळ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर समाज कल्याण सभापती झाले आणि काक्रंबा मतदार संघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्...
धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांची निवड झाली आहे त्यांनी महाविकास आघाडीचे अक्षय जोगदंड यांचा 13 मतांनी पराभव केला. तसेच नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पार्टी कडून सुजित साळुंखे आणि अमोल राजे निंबाळकर तर शिवसेना उबाठा कडून पंकज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पंकज भोसले यांची निवड झाली. धाराशिव नगरपालिकेचे विशेष सर्वसाधारण सभा आज 16 जानेवारी रोजी घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे नगरसेवक अक्षय जोगदंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता तर भारतीय जनता पार्टी कडून अक्षय ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.यावेळी झालेल्या निवडणुकीत नगरपालिकेत बहुमतात असलेल्या भारतीय जनता पार्टीला 22 नगरसेवकांचे मतदान झाले.याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांचेही मत अक्षय ढोबळे या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा