जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी घेतली आढावा बैठक

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत उमरग्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार श्री. प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नजनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. गावागावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावेअसे आवाहन करण्यात आले.

उमेदवार कोणताही असोत्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे,” असे सांगत प्रामाणिक कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे उमरगा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार श्री प्रवीण स्वामी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे,सुलतान शेठ,तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,अजित चौधरी,रणधीर भाऊ पवारसुधाकरपाटीलगुलाब मोरेविजयकुमार नागनेविजयकुमार तळभोगेअजित पाटीलधिरज बेळंबकरशेखर पाटीलसालिम शेखवहाब अतार,समाने सावकारविठ्ठल साठे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे