स्वातंत्र्यदिन बातमी

Slug -- उस्मानाबाद इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण

Story filed by -- देविदास पाठक उस्मानाबाद 
 15 ऑगस्ट 2020

Anc-- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आज उस्मानाबादेत पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने पालकमंत्र्यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. तसंच राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस निरीक्षक श्री दगू   शेख तसेच पोलीस महासंचालक पदक विजेते पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. तसेच पालकमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर,नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच करुणा रुग्णावर यशस्वी मात केलेल्या  रुग्णांचा पालकमंत्र्यानी सत्कार केला , त्यांचे मनोधैर्य वाढवले आणि कोरोना योध्द्यांप्रति  कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या कोरोना होम आयसोलेशन काळजी उपाय प्रतिबंध याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं. यामधून कोरोना  बाधित असलेल्यांनी कोणती काळजी घ्यायची त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे