कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यातील तिघांचा म्रुत्यु
उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे तिघांचा म्रुत्यु ==================================उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असुन 185 जणांना कोरोना ची लागण झाली आहे. मृतामध्ये उमरगा तालुक्यातील दोन आणि उस्मानाबाद तालुक्यातील एकाचा समावेश आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या 97 तर एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 414 इतकी झाली आहे. तर 1650 रुग्णांना रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे 1667 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आढळले असून उस्मानाबाद तालुक्यात 70 तुळजापूर तालुक्यात 22 उमरगा तालुक्यात 27 कळंब तालुक्यात 17 परंडा तालुक्यात 24 लोहारा तालुक्यात सहा भूम तालुक्यात सोहळा वाशी तालुक्यातील तीन असे सर्व मिळून 185 रुग्ण आढळले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा