धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत, परंतु उर्वरित दिवशी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23, 24 आणि 27 जानेवारी असे तीन दिवस असणार आहेत. 25 आणि 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी तर मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नलावडे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री ओमकार देशमुख पुढे म्हणाले ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा