बुध्द पौर्णिमेच्या निमीत्ताने रक्तदान शिबीर

उद्या 26 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि मुक्ती सेवा समिती च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोरोनामुळे रक्त साठा संपत असल्या च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करून प्रत्यक्ष रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. यानिमित्ताने दहा वाजता होत असलेल्या या कार्यक्रमात आरंभी बुद्धांना अभिवादन करून बुद्धवंदना त्यानंतर शिबिराला सुरुवात होणार आहे. रा स्व संघाचे जिल्हा संघचालक माननीय श्री अनिल राव यादव सर तसेच भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉक्टर अभय शहापूरकर जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर आदिनाथ राजगुरू कार्यवाह एडवोकेट श्रीकृष्ण मसलेकर यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. उस्मानाबाद शहरातील समर्थ नगर भागातील कोर्टाच्या  पाठीमागे असलेल्या महाराणा फंक्शन हॉल येथे होत असलेल्या या रक्तदान शिबिर आणि बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमासाठी शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी संपर्क करावा असे आवाहन जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

काक्रंबा गटातून सौ अस्मिताताई कांबळे यांची दावेदारी

धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे